करुं या स्वागत दिव्य गुणांचे ।
सत् चित् आनंद रूप जयांचे ।।धृ।।
चौदा विद्या सकल कला ह्या ।
गाति गोडवे सत् धर्माचे ।।१।।
चिद्विलासरूप सृष्टी असे ही ।
पान करुं आनंदरसांचे ।।२।।
प्रेम देऊ या प्रेम घेऊ या ।
दर्शन देऊ मानवतेचें ।।३।।
जीव जनार्दनी लीन होऊनी ।
करुं सफल नीज जीवन साचें ।।४।।
- जय सच्चिदानंद -
रचियता
प.पू.भय्याजी महाराज