Sixth

||  मनोगत  ||

एक भक्तिमार्ग-दीपक

लेखक विद्धाधर गोखले
मुंबई

जगताच्या चालकशक्तीपाशी भेदभाव नाही, ‘समत्वं सर्वभूतेषु’ हयाच वृत्तीने जगच्चालक वागतो साहजिकच त्यानेच निर्माण केलेली पंचमहाभूतेहि भेदभाव पाळत नाहीत. गगन असो वा धरणी, अग्नि असो वा पाणी, मानवी भेदभाव-बुद्धीने वागत नाहीत ! गाईची तृषा हरु। व्याघ्रा विष होऊनि मारु।। हे नेणेचि गा करु। तोय जैसे।।

मग त्याच जगच्चालकाच्या जणू सगुण साकार मूर्ति असे संत तरी जाति-धर्म पंथ, रावरंक-खंक इत्यादि भेदांना का थारा देतील? कोठल्याही देशाचे कोठल्याहि काळाचें सत्पुरूष घ्या. त्यांनी ‘भेदाभेद अमंगलच’ मानलेले दिसतात.

पहा ना, कोठे हरियानातील नगाडा खेड्यात जन्मलेले महमंद शफीसाहेब आणि नागपूर नजिकच्या शक्करदÚयाचे अवलिया ताजुद्दीनबाबा! पण ईश्वरी प्रेरणेने 1923 साली ते एकत्र येतात नि प्रादेशिक भेदाच्या भिंती उल्लंघून एकरुप होतात. ताजुद्दीन औलियांचे शिष्य शफीसाहेब धर्माने मुसलमान आणि सुखदेवजी नारायणजी बुधोलिया उर्फ भय्याजी महाराज धर्माने हिंदू ब्राह्मण-पहिले दूर उत्तर भारतातले तर दूसरे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर नजिकच्या सावंगीचे पहिले बालब्रम्हचारी तर दुसरे प्रपंच नेटका करणारे गृहस्थाश्रमी-पण त्यांचे 1940 साली पहिल्या मुलाखतींतच मनोमिलन झाले. इतके की शफीसाहेबांनी आपल्या अंतकाळी (27 जाने. 1970) सर्व शिष्यांच्या समक्ष ताजुद्दीन-गादीचे परंपरागत उत्तराधिकारी म्हणून भय्याजींची नियुक्ती केली. अध्यात्माच्या क्षेत्रात, भगवत्- भक्तीच्या नंदनवनात, ‘हा ब्राह्मण-हा अब्राह्मण ‘हा हिंदू, हा मुसलमान’ असा भेद नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. आणि म्हणूनच शक्करदÚयाला काय अथवा सावंगीला काय आजहि-‘‘आता हे वज्द मुझको हर दीनकी अदापर मस्जिद मे नाचता हूॅं, नाकुसकी सदापर’’

(प्रत्येक धर्मांच्या उपासना-पद्धतीमुळे मी आनंदाने आत्मविस्मृत होतो, ईश्वरी तत्त्वांशी तन्मय होतो, अहो, हिंदूच्या देवळातील शंख निनाद कानी पडतांच, मी मशिदीत तल्लीन होऊन नाचू लागतो!) अशी सर्वधर्मसमभावना रुजलेली दिसते. (आम्ही स्वतःसावगंी येथे एका मकर-संक्रात मेळाव्याला, ताज आनंदाश्रमात प्रवचन द्यायला गेलो होतो. तेव्हा आम्हांस शेकडो हिंदू मुसलमान भाविक एकाच भक्तिभावात मश्गुल झालेले आढळले)

अशा या सावंगी येथील ब्रह्मलीन भय्याजी महाराज हयांचे समाजोपयोगी उपदेश, ‘‘अध्यात्मपर प्रार्थना-स्तोत्र-नामक पुस्तक, यांचे सुपुत्र दामोदर उर्फ बाबाजी बुधोलिया हयांनी प्रकाशित केले आहे. त्यांतील विवेचन हे सर्वधर्मसमभावना वाढीस नि शुद्ध ईश्वरोपासना जोपासण्यास उपयुक्त ठरेल, यांत शंका नाही, आत्मानुभूतिच्या तळमळीने नि आर्ततेने सद्गुरुला मदतीसाठी व मार्गदर्शनासाठी केलेली प्रार्थना, हे जरी हया पुस्तकाचे एकूण स्वरूप असले, तरी त्यांत समाजाला आवश्यक असलेला नीति-उपदेशहि अधून मधून झिरपतोच आहे. उदाहरणार्थ, महात्मा गांधींनी श्म्कनबंजपवद ॅपजीवनज ब्ींतंबजमतए च्वसपजपबे ॅपजीवनज च्तपदबपचसमण्ष् इत्यादि पातकाविषयी राष्ट्राला जो इशारा दिला होता, तोच पुढील ब्र. भय्याजी महाराजांनी पुढील पढतमूर्ख लक्षण्ंाात ग्रथित केला आहे-

चारित्र्यहीन ज्ञान । अमानवतेत विज्ञान।
तत्वशून्य राजकारण । पढतमूर्ख ।।
अनीतीचा व्यापार । श्रमाविण कुबेर ।
त्यागावाचून धर्मवीर । पढतमूर्ख ।। (प्रा.स्तो.)



हा लहानसा ग्रंथ म्हणजे भक्तिमार्गांवरील एक दिवा आहे. साहजिकच त्याचा प्रारंभ ‘परब्रह्म’ विचाराने झाला असल्यास नवल नाही, परब्रह्म परमेश्वर जर डोळयांना दिसत नाही, एखाद्या प्रयोगशाळेत त्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नही. तर त्याचे भजन-पूजन-चिंतन करणे हा शुद्ध आंधळेपणा नव्हे काय? अशी शंका विचारणाÚया नास्तिकांना सहज पटेल असा दृष्टान्त ते देतात-

‘दुधांतहि लोणी दिले न। तरी ते विद्यमान, तयातची.’ चर्मचक्षंूना वा दुर्बिणींना दिसत नसला, तरी तो अनादि अनंत परमात्मा चराचरांत आहेच आहे। तो स्वयंबोध आहे, स्वयंसिद्ध आहे. भिन्नभिन्न धर्मांनी त्याला भिन्नभिन्न नावांनी संबोधिले असले तरी तो एकच आहे-

वेदवाणी ‘परब्रह्म’ । ‘अल्लाह’ बोलत इस्लाम।
‘गाॅड’ हे इंग्रजी नाम। सर्व साक्षी ।। (प्रा.स्तो.)



हया सर्वसाक्षी परमेश्वराचा साक्षात्कार हेच मानवाचे सर्वोच्च ध्येय होय. पण हे साधायचे कसे? जड दृष्टीला, देहात्म बुद्धीला त्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही. सत्, चित् व आनंद हे गुण ज्यांच्या ठायी आहेत, अशी गुरूच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ‘भक्तिपंथेची जावे’ तेव्हांच परमात्म्याची अनुभूति शक्य आहे. हा भक्तिपंथ कोणी यशस्वीपणे आक्रमिला त्यांची विस्तृत यादी भय्याजी महाराजांनी दिली आहे. तीत ध्रृव-प्रल्हादापासून तो महमंद पैगबंर।भगवान बुद्ध महावीर महात्मा ईसा कबीर। दिव्यपुरूष।। मुक्ताई मन्सूर। निवृत्ति ज्ञानेश्वर। इत्यादि

इत्यादि विविध धर्म-पंथाच्या संताचा जो अंतर्भाव केलेला आहे तो पाहून महाराजांच्या विशाल वृत्तीची सहज कल्पना येते. या संताचा केवळ उल्लेख करूनच ते थंाबले नाहीत तर त्यातील ध्रृव, मारूती, यशोदा, रूक्मिणी, शेख फरीद, कूर्मदास, पुंडलिक हयांची तळमळ नि निष्ठाहि थोडक्यंात पण परिणामकारक रीत्या त्यांनी वर्णन केली आहे परमेश्वराच्या दर्शनाची-अनुभूतीची-केवढी ओढ शेख फरीदला लागली होती हे सांगताना त्यांचा पुढील विख्यात देह त्यांनी उद्धृत केला आहे-

कागा! सब तन खईयों, चुन चुन खईयांे मांस।
दो नैना छांड दे। पिया-मिलन की आस!
( सुखे खावे सर्व तन। पण वाचवाहो नयन।
प्रियतमाचे दर्शन। घ्यावया।।) (प्रा.स्तो.)



ही अनन्यशरणता, अशीच तीव्र तळमळ, ही पिया-मिलन की प्यास प्रस्तुत प्रार्थना-स्तोत्रांत सर्वत्र आढळते. हया तळमळीतूनच कठोंर आत्मपरिक्षण निर्माण होते; अपूर्णतेची खंत वाटते; स्वतःच्या त्रुटी तीव्रतेने जाणवतात. आणि मग ते स्वतःची (कधी कधी प्रमाणाबाहेर ) निर्भत्र्सना करतात-

मी तर पापी महान। मनोदवता प्रमाण। वाल्हया गणिकांही गौण । मजपुढे।।
आधीच कडू कारले। त्यात विषयांचे मसाले।
पोट फुगेवरी झाले। जेवण तें।।
असा मी अधमाधम। नि आपण पुरूषोत्तम।
द्या हो द्या विश्राम। पायधुळीं।। (प्रा.स्तो.)



अर्थात ही आत्मनिंदा वाच्यार्थाने घ्यावयाची नाही. साधकाच्या भावना तीव्र झाल्या की, असे पश्चातापाचे बोल मुखावाटे बाहेर पडतातच. मग आपोआपच श्रवण, कीर्तन-नामस्मरण इत्यादि साधनेच्या पायÚया ओलांडल्या जाऊन अखेर सर्वस्व-समर्पण घडते, हे सर्वस्व समर्पण म्हणजेच ‘आत्मनिवेदनम्’ भक्तिच्या पूर्ण साफल्याला अत्यंत आवश्यक आहे. हीच ती अनन्य-शरणता! तिचे सुंदर आविष्कार भय्याजींच्या हया पुस्तिकेत आढळतात- उदाहरणार्थ,

उधळली (हरिणी) चैखुरी। सैरावैरा बावरी।। वणवा सभोवारी । मार्ग गवसेना।।
करा हों वृष्टि शीघ्रतर। संकट हे सारा दूर।
मनोमृगाला आधार। आपुली कृपा।।
तारा अथवा मारा। नांव जसा वारा।
भाव तसा थारा। आपुले ब्रीद।।
द्या हो द्या आशिर्वचन। गळला बा स्वाभिमान।
आणि सकलही जीवन। शरणांगत।। (प्रा.स्तो.)



अशा अनन्यशरणागती शिवाय मनुष्याच्या अहंकाराचा लोप होऊच शकत नाही. आणि जेथे अहंकारी माणसाला साधें भौतिक जीवनातील प्रेमहि मिळत नाही, तिथे देवाचे सख्यत्व कसे लाभावे? ‘अहं’च्या नाशाविना ‘सोऽह म्’ ‘शिवोऽहम्’ चा उदय होतच नसतो; हे भय्याजी महाराजांनी आवर्जून सांगितले आहे.

यांची भाषा अ्रगदी सोपी सुबोध आणि प्रसन्न आहे. वैचारीक गोंधळ कोठेच नाही. आणि असेल कसा? त्यांचे बोलणे प्रचीतीचे आणि चालणें ज्ञानेश्वरी, दासबोध-तुकोबांची गाथा हयांना वाट पुसत! ओवीवर ज्ञानेश्वरीची छाप स्पष्ट आहे.

त्यांच्या हितोपदेशाने कालचा दानव हा आजचा मानव नि उद्याचा देव वा देवमाणूस होवो हीच अपेक्षा.


पूजनीय भय्याजीचे ‘‘प्रार्थना स्तोत्र’’आधुनिक केकावली



लेखक-डाॅ.यु.म.पठाण
अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख
मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

पू.भय्याजींनी प्रार्थनास्तोत्र लिहिले त्यामागील प्रेरणा तत्त्व- विवेचन व साधकांना साधनेची, भक्तीची प्रेरणा देणे हा होता. या गं्रथाचे दोन भाग आहेत. 1) परब्रह्म 2) प्रार्थना परब्रह्म विषयक भागात भय्याजींनी परतत्त्वाचे परमेश्वराचे स्वरूप विशद केले आहे. हे परतत्त्व निर्गुण निराकार आहे. तथापि हे निर्गुण निराकार तत्त्व सर्व सामा- न्यासाठी सगुण साकारहि झाले आहे. सगुणोपासना आणि निर्गुणोपासना यातील अनुबंध भय्याजीनी या ग्रंथात फार चंागल्या प्रकारे विशद केला आहे. परमब्रह्माचे हे स्वरूप तसे पाहिले तर शब्दबद्ध करण्याजोगे नाही. म्हणूनच वेदांनी त्याचे वर्णन करताना ‘नेतिनेति’ असे म्हटले आहे. भय्याजी म्हणतात.



तसें तें अनादि निर्गुण।स्व-स्वरूपीं सदा लीन।
स्वयंबोध, आनंदघन। ‘नेति नेति’ ।। (प्रा.स्तो.)



पण परतत्त्वाचे स्वरूप हे असे अगाध, अनिर्वचनीय असले तरी निरनिराळया आस्तिकमतवादी धर्मांनी त्याला ‘वचनीय’ किंवा ‘शब्दबद्ध’ केले आहे. भय्याजी म्हणतात-

वेदवाणी ‘परब्रह्म’, ‘अल्लाह’ बोलत इस्लाम।
‘गाॅड’ हे इंग्रजी नाम, सर्वसाक्षी। (प्रा.स्तो.)



आणि हे निर्गुण, निराकार परब्रह्म भक्तांच्या उद्धारासाठी सगुण, साकार झाले आहे.

सत् चित् आणि आनंदमय असे हे परब्रह्म सगुण रूपात प्रकटते ते साधकांना आत्मबोध प्राप्त करुन देण्यासाठी, त्यांना त्यांच्यामधील आत्मतत्त्वाचे अस्तित्व दाखविण्यासाठी-

आर्तांच्या आळवणींत। पतितांच्या प्रार्थनंेत।
भक्तांच्या भावरसांत। सगुण रुप।।
येणें रीती प्रगटीकरण। प्रथमोपाधि चित्गुण।
नि शेष आनंदगुण। त्यांतचि।। (प्रा.स्तो.)



तशा प्रकारच्या निराकार परतत्त्वाची साधना जे करतात ते दिव्य पुरूष होत. हे दिव्य-पुरूष प्रार्थनेच्या रूपाने त्याची उपासना करतात. दिव्य पुरूषांची नामावलि देताना भय्याजींनी सर्व जाति जमातीच्या व धर्माच्या सत्पुरूषांचा व विभूतिंचा निर्देश केला आहे. यातून त्यांचा सर्वधर्मसमभाव विषयक दृष्टिकोण प्रत्ययास आल्या शिवाय रहात नाही.या दिव्य पुरूषांत जसे ध्रृव प्रल्हाद आहेत, तसेच नाथ संप्रदायाचे मत्स्येंद्र व गोरखनाथहि आहेत. हजरत महंमद पैगंबर आहेत. तसेच गुरू नानकहि आहेत. समर्थ संप्रदायाचे रामदासहि आहेत. तसेच सुफी संप्रदायाचे ख्वाजा मोईद्दिन चिस्ती आहेत. सजन कसायाप्रमाणेच चोखामेळा ही आहेत, विवेकानंद आणि अरविंद आहेत, या सर्व दिव्य पुरूषांनी ज्याप्रमाणे परमेश्वराची उपासना व प्रार्थना करून साधना केली त्याचा आदर्श सामान्य माणसानेही आपल्यासमोर ठेवावा व आपला उद्धार करून घ्यावा हा विचार भय्याजीनी आपल्या हया काव्यांत अत्यंत मार्मिकपणे प्रतिपादिला आहे.

त्यानंतर त्यंानी प्रार्थना विभागात परमेश्वराची करूणा भाकली आहे. शरणागति, विरह, ईश्वरभेटीची आत्यांतिक उत्कटता, त्यांत प्रकटली आहे.
भय्याजींच्या या लेखनाची तुलना साधकावस्थेतील अभंगाची करावीशी वाटते.

चंद्रमा पाहूनि गगनी। फुलतीं त्या कुमुदिनी।
नि चकोरहि हर्षत, मनीं। तसा मी आपणा।। (प्रा.स्तो.)



या सारख्या कडव्यातून किंवा कासवी जशी पिलांना, पाजतसे दृष्टिपान्हा। तसाचि जाणुनी तान्हा, दयादृष्टिपान करा हो।।(प्रा.स्तो.)

या सारख्या कडव्यातून भक्ताची ही आर्तता प्रकटली आहे. मोरोपंताच्या केकावलीतहि तशीच आर्तता प्रकटली असल्याने त्या कवितेची तुलना मोरोपंताच्या केकावलीशीही करण्याचा मोह होतो. शरणगति विरह, मीलनाची उत्कटता, प्रपंच विन्मुखता व परमार्थ प्रवणता या सर्व भाव भावनांचा व प्रवृत्तिंचा सुरेख संगम प्रार्थना स्तोत्रात झाला आहे. साधकांना हा गं्रथ प्रेरक व मार्गदर्शक ठरेल असा मला विश्वास वाटतो.

भय्याजी महाराज-सर्वधर्मसमभाव व आत्मसाधना याचा आधुनिक आदर्श


बाळासाहेब भारदे



लेखक-बाळासाहेब भारदे
अध्यक्ष,खादी ग्रामोद्य्रोग महामंडळ,
महाराष्ट्र राज्य मुंबई

आपल्या जीवनाचा विचार करणारा प्राणी म्हणजे मानव जीवना मध्ये सुखदुःखाचे अनुभव त्याच्या विचाराला सतत चालना देत असतात. त्यातहि जन्म-जरा-मरण या अपरिहार्य अवस्थांचा विचार माणसाला गंभीर विचार करावयास लावतो. जगाची व आपल्या मत्र्य जीवनाची नश्वरता वा क्षणभंगुरता विचारी मनाला सारखी अस्वस्थ करीत असते. आपण जगावे ही मानवी जीवनंातील सर्वप्रभावी इच्छा आहे. या जिजीविशेतून-जगण्याच्या इच्छेतून सर्व पुरूषार्थ प्रयत्न मानव करीत असतो. आपण जगावे व त्यासाठी अर्थसाधन प्राप्त करावे ही अर्थप्रेरणा आहे. आपला देह कधीतरी जाणारच आहे म्हणून वंशरूपाने आपण जगावे ही कामप्रेरणा आहे. वंश जगावयाचा असेल तर तो आपापसातील यादवीत नष्ट होऊ नये त्यासाठी कांही नेमधर्म असलेला समाज आवश्यक आहे. असा समाज म्हणून आपण व आपला वंश जगावा याला धर्मप्रेरणा म्हणतात. पण शेवटी एक प्रश्न शिल्लक राहतो आणि तो म्हणजे आपण मरणार हा! तेव्हा मरण म्हणजे सर्व नष्ट होणे नव्हे तर अवस्थांतर आहे असे ज्ञान झाल्याशिवाय माणूस जन्म मरणावर मात करू शकणार नाही. मेलो तरी जगणार अमर होणार हीच मोक्ष प्रेरणा आहे. धर्मार्थकाममोक्ष या चारहि पुरूषार्थाची स्वजीवनांत आणि समाज जीवनांत संगती लावून संपन्न आणि प्रसन्न जीवन घालविण्याचा विचार म्हणजेच तत्त्वज्ञान होय.

पहावे आपणांसि आपण। या नांव ज्ञान।।



तत्त्वज्ञानाच्या उहापोहांत फारसे न जाता असे म्हणता येईल की माणसाला स्वतःच्या स्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय, तो जीवन कृतार्थ करू शकणार नाही. आपण कोण आहोत, आपले स्वस्वरूप काय आहे., आपण व आपल्या सभोवतालचे जग कसे आहे, त्याची निर्मिती व व्यवस्थिती कशामुळे आहे, जगाच्या निर्मात्याचे व नियंत्याचे रहस्य काय आहे? तो नियंता सृष्टी आणि आपण यांचे नाते तरी काय आहे? इत्यादि प्रश्न विचारी माणसाच्या मनांत येतात ब्रह्मरूप,विश्वरूप आणि स्वस्वरूप यांचा विचार म्हणजेच आत्मज्ञानाची साधना! ‘अंतवंत इमे नित्य सोब्ताः शरीरिणः देहः’ देह नाशवंत आहे. विश्वालाहि उत्पति-स्थिती-लय आहे हे विचारी माणूस जाणून आहे. आणि म्हणूनच जगांत एकच अविनाशी सत्तत्व आहे असे विचारान्ति त्याला पटू लागते. ‘अविनाशि तु तद्द्विद्धि सर्वमिदंततम्। जीव सृष्टी विश्वसृष्टी ज्याच्यामुळे असते वा भासते ते एकच अविनाशी तत्व आहे अशी त्याची धारणा होते. परंतु केवळ बुद्धीने त्याचे आकलन होत नाही. सर्व जीवन जेव्हा तन्मय होत होत तदाकार बनते तेंव्हा त्या आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो व मग देही असोनी तो विदेही असतो. प्रपंचात राहूनहि त्याचा सदानंद खंडित होत नाही आणि तो आपल्या दिव्यानंदाच्या प्रत्ययाने शरणगतालाहि आनंद प्राप्त करून देतो. या प्रक्रियेत पुरूषाचा सत्पुरूष होतो. सत्पुरूषाचा सद्गुरू होतो, आणि समाजांत सत्धर्म प्रवर्तक म्हणून अवतार कार्य करतो. जगांत व विशेषतः भारतात अनेक सत्पुरूष होऊन गेलेत व आजहि आहेत. भय्याजी महाराज हे या सत्पुरूष मालिकेतील एक योगी. ते हयात असतांना त्यांच्या सावंगी आश्रमात जाण्याचा मला दोन तीनदा योग आला. अनासक्त वृत्ति आणि अनन्य भक्ति यांच्या समन्वयातून प्रसन्न विभूतिमत्व कसे विकसित होते त्याची साक्ष त्यांच्या सत्संगात मला पटली.

आज समाजांत स्वार्थपरायणता वाढली आहे. महाराजांच्या वच- नानुसार, ’‘कालचा दानव, आजचा मानव, उदईक देव सार हा’’ असा हा उत्क्रांन्तिक्रम असला तरी स्वार्थ लोभामुळे आजचा मानव दानवालाहि लाजवील अशी कृत्यें कांही ठिकाणी करून राहिला आहे हेहि आपण पाहतो. याचे कारण त्याच्या ठिकाणी सुप्त देवत्व असतांनाहि ते जागे करण्याचे संस्कार त्याच्यावर घडावेत असे आध ुनिक अर्थभोग प्रधान प्रगतीच्या मागे लागलेल्या लोकांना वाटत नाही. आणि बहुतेक देशाची व समाजाची सूत्रे सत्ताधारी, लक्ष्मीधारी व स्वमहत्त्वाकांक्षी लोकांकडे गेली आहेत. त्यामुळे स्वतःच्या आकांक्षापूर्तीसाठी धनविद्यासत्ता या साधनंाचा उपयोग करून घेण्याकडे मान्यवर मातबर धुरीणांचा कल आहे. स्वार्थावर मात करण्याचा अध्यात्मिक प्रक्रियांचा प्रभाव वाढल्या शिवाय अपप्रवृत्तीला, अनाचार, अत्याचार इत्यादि समाज विघातक प्रवृत्तींना आवरता येणार नाही. ही गोष्ट आता सर्वक्षेत्रातील जाणते लोकहि मान्य करू लागले आहेत. ही अध्यात्मिक प्रक्रिया प्रभावी कशी होईल याचा आपण विचार करू लागलो तर शिक्षण, लोकजागृति, धर्मपरंपरा, राजनीति इत्यादि समाज परिवर्तनाच्या तथाकथित मान्य प्रक्रियेपासून कार्यभाग होणार नही हे लक्षांत घेतले पाहिजे. शिक्षणाने मनुष्य हुशार होईल पण चांगला होईल याची जाण शिक्षणाला नाही. लोक जागृतीचा आधार भौतिक असेल तर विकास वाढेल. पण हव्यासहि वाढेल. आणि परिणामी अशांति वाढेल. धर्म परंपरा जाति- धर्माला धर्म समजू लागली तर नीति धर्म बाजूला राहील व धर्माच्या नावावर दंगे धोपे अत्याचार याच गोष्टीलस ऊत येईल. या गोष्टी आपण पंजाबमध्ये अनुभवत आहोतच. म्हणूनच धर्माच्या नावावर राष्ट्रधर्म उध्वस्त होत असताना राष्ट्रीय एकात्मता साधणाÚया पंथ निरपेक्ष अध्यात्मधर्माची अत्यंत आवश्यकता आहे. खरे अध्यात्मज्ञान व खरा दिव्यधर्म जातपात धर्मभेद मानीत नाही. हे अनेक संत सत्पुरूषांनी सिद्ध करून दाखविले आहे. भय्याजी महाराजांचे सद्गुरू तथाकथित मुसलमान धर्माचे होते आणि आत्मसाधनेच्या क्षेत्रात हिंदु, मुसलमान महाजन हरिजन हा भेदभाव मुळीच राहू शकत नाही. याचा भय्याजी महाराज हा एक आधुनिक आदर्श आहे.

आजच्या काळात जाति धर्माला नीतिधर्माची व धार्मिक उपचा- रांना सदाचाराची जोड दिल्याशिवाय धर्महि शिल्लक राहणार नाही. व मानव संस्कृतीही टिकणार नाही हे जाणत्या लोकांना स्पष्ट दिसत आहे. म्हणून भय्याजी महाराजांसारखा अध्यात्मिक मानवतेची साधना करणा Úया सत्पुरूषांच्या जीवन संदेशाची आज अत्यंत आवश्यकता आहे.


प्रार्थना स्तोत्र
मराठी वाङ्मयातील अभिनव रत्न



लेखक-श्री भा. वर्णेकर
नागपूर

श्री हनुमान जयंतीच्या शुभदिनी ‘स्मृति गाथा’ विशेषांक प्रकाशित होणर हे वाचून आनंद वाटला. प्रार्थना स्तोत्र हे मराठी आध्यात्मिक वाङ्मयातील एक अभिनव रत्न आहे. स्व. भय्याजी महाराजांनी त्याची एक प्रत पूर्वीच मजकडे पाठविली होती व त्याचे संस्कृत पùात्मक भाषांतर करण्याची सूचना ही दिली होती. ती-शिरसा वन्द्य मानून मी भाषंातर केले. त्याचे केव्हा तरी आणि कोणीतरी प्रकाशन करावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली होती; परंतु ती सफल होईल याची मला आशा आहे.

भाषांतर माझ्या संग्रही’ आहे आपण ते आपल्या स्वाधीन करावे व यथावकाश त्याच्या प्रकाशनाची व्यवस्था करावी अशी माझी प्रार्थना आहे! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेचा संस्कृत अनुवाद करण्याचे दायित्व श्री तुकाराम दादा गीताचार्य यानी गतवर्षी मजवर सोपविले. ते मी पूर्ण केले व यांनी लगोलग ते भाषांतर (ग्रामगीतामृतम्) महाराजांच्या अमृतोत्सव प्रसंगी छापून प्रकाशित केले. आपणही ब्र. भय्याजी महाराजांच्या स्तोत्राचा माझा संस्कृतानुवाद अशाच तत्परतेने प्रकाशित करण्याची व्यवस्था करावी ही विनंती.

सत्पुरूषांचे दर्शन प्राक्तन सुकृतामुळे घडते, हे सुकृत थोडे अधिक असले तर त्यांचा सहवास घडतो आणि त्याहीपेक्षा अधिक असले तर त्यांचा अनुग्रह लाभून निश्रेयसाचा लाभ होतो अशी माझी श्रद्धा आहे ब्रह्मीभूत श्री भय्याजी महाराजांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.


MY "GURU"
Poojaniya Bhayyaji Maharaj



By. Dr. Dadi Balsara,
HONGKONG

Chemist, astrologer, doctor of medicine, mystic, psychiatrist, jet pilot and karate champion but, most of all, he's known as Singpore's Mr. Perfume, the man who put the of the Republic of Singapore on the perfume map of the world; this is the inimitable mercurial and dyna mic business tycoon, Dr Dadi Balsara. The sweet scent of succeess came to him by dint of hard work and a sharp mind. His business empire flourishes in thirty-one countries around the globe. This man has walked with kings, and yet has not lost the common touch. He returns, time and again, to the country and city of his birth and youth, and remembers with humble gratitude, the great souls who have led him from comparative obscurity to the Present Preeminent position he holds in the international business sphere.

Dr, Dadi Balsara states that he has attained all this through the guidance, grace and blessings of his Supreme Master, Tajuddin Baba, and his guru, Sukhdevji Maharaj. He has been in their fold for the last thirty years. One very important lesson that Dr. Balsara has learnt from these highty-evolved souls is that when one is at the feet of gurus and masters, one must totally surrender one's ego to their will uncond-itionally.

Dr. Balsara says "I have had many personal and soul-satisfying experiences with Sukhdevji Maharaj. I have derived great spiritual solace and forceful inspiration from him. Whenever I approached him with my problems. I was never sent away without a solution being shown to me, Whatever I am today, I sincerely believe, is because I have earned their grace & blessings. Sukhdevji Maharaj is now in samadhi. I do not feel that I have lost him. In fact, I'm sure, nay, I'm positive, that he will always be with me, and that he will continue to help me to do whatever is good, whatever is noble. His hand will ever be there to sustain me, support me and give me spiritual strength in my cndeavours to help mankind."


प्रार्थना स्तोत्र
मराठी वाङ्मयातील अभिनव रत्न



लेखक-श्री भा. वर्णेकर
नागपूर

श्री हनुमान जयंतीच्या शुभदिनी ‘स्मृति गाथा’ विशेषांक प्रकाशित होणर हे वाचून आनंद वाटला. प्रार्थना स्तोत्र हे मराठी आध्यात्मिक वाङ्मयातील एक अभिनव रत्न आहे. स्व. भय्याजी महाराजांनी त्याची एक प्रत पूर्वीच मजकडे पाठविली होती व त्याचे संस्कृत पùात्मक भाषांतर करण्याची सूचना ही दिली होती. ती-शिरसा वन्द्य मानून मी भाषंातर केले. त्याचे केव्हा तरी आणि कोणीतरी प्रकाशन करावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली होती; परंतु ती सफल होईल याची मला आशा आहे.

भाषांतर माझ्या संग्रही’ आहे आपण ते आपल्या स्वाधीन करावे व यथावकाश त्याच्या प्रकाशनाची व्यवस्था करावी अशी माझी प्रार्थना आहे! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेचा संस्कृत अनुवाद करण्याचे दायित्व श्री तुकाराम दादा गीताचार्य यानी गतवर्षी मजवर सोपविले. ते मी पूर्ण केले व यांनी लगोलग ते भाषांतर (ग्रामगीतामृतम्) महाराजांच्या अमृतोत्सव प्रसंगी छापून प्रकाशित केले. आपणही ब्र. भय्याजी महाराजांच्या स्तोत्राचा माझा संस्कृतानुवाद अशाच तत्परतेने प्रकाशित करण्याची व्यवस्था करावी ही विनंती.

सत्पुरूषांचे दर्शन प्राक्तन सुकृतामुळे घडते, हे सुकृत थोडे अधिक असले तर त्यांचा सहवास घडतो आणि त्याहीपेक्षा अधिक असले तर त्यांचा अनुग्रह लाभून निश्रेयसाचा लाभ होतो अशी माझी श्रद्धा आहे ब्रह्मीभूत श्री भय्याजी महाराजांच्या स्मृतीस माझा साष्टांग नमस्कार.


पूजनीय भय्याजी महाराज एक महान द्रष्टे



लेखक-ना.भ.मा.गायकवाड
कृषि व फलोद्यान मंत्री
महाराष्ट्र राज्य

ब्रह्मलीन परमपूज्य भय्याजी महाराज एक महान द्रष्टे होते. आधुनिक काळात माणसाचे जीवन दिवसें दिवस धकाधकीचे व यंत्रमय बनत आहे. एकत्रित कुटुंब व्यवस्था कोलमडून पडली आहे. त्याच्या सुखाच्या व एैषआरामाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वाटेल त्या मार्गाने जास्तीत-जास्त पैसा मिळविणे व जास्तीत जास्त चैन व विलास भोगणे याकडे माणसा-माणसात चढा ओढ चालली आहे. त्याच बरोबर माणूस माणूसकीपासून दूर-दूर जात आहे. प्रचंड पैसा मिळवून व अमर्याद ऐश्वर्य भोगूनही त्याला समाधान नाही, त्याच्या आत्म्याला शांती नाही.

जीवनात माणसाला समाधान व आत्मीक शांतीची खरी गरज आहे. त्याकरिता सर्वसामान्य माणसामधे माणुसकीची जाण निर्माण होणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता जाती-जातीमधील भेद, धर्माच्या नावांवर मानवांचा होणारा संहार हा थांबला पाहिजे. जो धर्म माणसा-माणसामध्ये भेद निर्माण करतो तो खरा धर्म नव्हे. त्याकरिता गरज आहे मानवधर्माची माणूसकी निर्माण करण्याची व त्याकरिता विज्ञानाला अध्यात्मवादाची जोड देण्याची आणि नेमके हेच व्रत भय्याजी महाराजांनी अंगिकारले होते. सन 1975 मध्ये नागपूरचा महापौर असतांना भय्याजी महाराजांचे प्रथम दर्शन घेण्याची संधी मला लाभली. तसेच बुधोलिया कुटुंबाशी 1952 पासूनचा परिचय परंतू साधू संतापासून व बाबालोकांपासून दोन हात दूर राहण्याचा माझा स्वभाव अलिकडील साधू-संत व बाबा लोकांबद्दल आदर नसलेला मी. परंतू जेव्हा परम पुजनिय भय्याजी महाराजंाशी माझा संबंध आला माझ्या अंतःकरणात विलक्षण आदराची भावना निर्माण झाली. साधे जीवन व साधी राहणी, सर्व सामान्यांना, गोरगरिबांना जवळ करणारे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणारे असे त्यांचे स्वाभाविक व्यक्तिमत्व होते. अंधश्रद्धा नाही. भोंदू प्रवृत्तीला थारा नाही, बुवाबाजी नाही केवळ यथार्थ मार्गदर्शन.

भय्याजी महाराजांचे ठिकाणी आदर ठेवणारा त्यांचे समोर प्रेमाने नतमस्तक होणारा असंख्य जन समुदाय आहे. भय्याजी महाराज त्याचेकडे येणाÚया अगणित लोकांशी प्रत्यक्ष जवळीक साधून होते. प्रत्येकाच्या कुटुंबातील व्यक्तिची विचारपूस ते जातीने करीत असत.

अध्यात्मवादावर मान्यवरांचे प्रवचन व सुविचार प्रत्येक मकर संक्रांती महापर्वदीनी ते घडवून आणत असत त्याला यात्रेचे स्वरूप यायचे. सन 1975 पासून आजपर्यत श्री ताज आनंद आश्रमामधे ज्या-ज्या वेळी समारंभ व्हायचे त्यावेळी मी व माझी पत्नी सौ. ताराबाई गायकवाड आत्मीयतेने उपस्थित राहिलो आहे. आमदार असतांना, मंत्री असतांना व साधा नागरिकही असतांना आम्ही आश्रमात गेलो आहो.

आज प्रत्यक्षात भय्याजी महाराज आपल्यात नाही. ते ब्रह्मलीन झाले. परंतु आश्रमचे परिसरात वावरतांना भय्याजी महाराजाच्या सजीव अस्तित्वाचा प्रत्यय येतो. प्रतीवर्षी मकर संक्रातीचे मुहुर्तावर अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्रावर प्रवचनादी कार्यक्रम करण्याचा भय्याजी महाराजांचा परिपाठ या नंतरही न चुकता चालू राहावा, मानव धर्माच्या शिकवणीतून राष्ट्रीय एकात्मतेची भावना जनमानसात रूजविण्याचे कार्य सतत चालू रहावे. श्री ताज आनंदाश्रम सावंगी या पवित्र भूमिस एक आगळे वेगळे स्वरूप प्राप्त व्हावे अशी मनापासून इच्छा व्यक्त करतो हीच परमपूज्य ब्रह्मलीन भय्याजी महाराजांचे चरणी आदरांजली व विनम्र श्रदांजली.


स्व.पी.व्ही. नरसिंहराव



मा.पंतप्रधान स्व.पी.व्ही. नरसिंहराव
पंतप्रधान

‘‘इस पवित्र आश्रम मे आकर मुझे दाआजी के सान्निध्य की अनुभूती हुई, मै अपने आपको धन्य मानता हुॅं।

दि.11-11-89 - मा.पंतप्रधान स्व.पी.व्ही. नरसिंहराव


श्री.मा.श्री कमलनाथजी



श्री.मा.श्री कमलनाथजी
केंद्रीय मंत्री

‘‘इस पवित्र स्थान मे जब भी मै आया, अधिक शांती मिली’’

दि. 21-11-89 - श्री.मा.श्री कमलनाथजी केंद्रीय मंत्री


मा.शंकररावजी चव्हाण



मा.शंकररावजी चव्हाण
(माजी गृहमंत्री भा.स.)

‘‘इस पवित्र स्थान मे पहुॅंचके बहोत बडा आश्रय मिला, दिल को शांती तथा हिंमत मिली।आजके समाधी दर्शन के बाद मै अपने आपको धन्य समझता हुॅं।जय भय्याजी महाराज।

- मा.शंकररावजी चव्हाण (माजी गृहमंत्री भा.स.)


मंडलेश्वर गीता मंदिर



मंडलेश्वर गीता मंदिर,
नागपूर

हम बहुत प्रसन्न है, यहाॅं आनेपर हमे आध्यात्मिक आनंद मिला है। इसको लिखना मुश्किल है।ऐसा आनंद सबको मिले। संस्था दिन- ब-दिन प्रगती करे, यही हमारी मंगल कामना है। - स्वामी दर्शनानंदजी

- दि. 14-1-90 - मंडलेश्वर गीता मंदिर, नागपूर