संस्थेचे ध्येय व उद्देश
या संस्थेचे प्रमुख ध्येय :- आमचे आराध्य दैवत ब्रम्हलीन परमपूजनिय़ श्री भय्याजी महाराज (दाजी) यांच्या दिव्यत्वाच्या व त्यांचे विरचीत दिव्य ग्रंथ 'अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र ' अध्यात्मिक तत्वांचा, ज्ञानाचा प्रसार / प्रचार नागपूर व शिवाय इतरत्र प्रदेश / देश / विदेशातही करून निहीत तत्व सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सदभावना स्थापना व दलीत, गरीब, महिला, सामाजीक, शैक्षणिक उत्थान ई. राहील.
१. श्री सद्गुरु भय्याजी महाराज विरचित दिव्य ग्रंथ अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्रामधील तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार त्याचे पारायण, भजन, किर्तन, व्याख्यान, परिचर्चा इत्यादी एवं अन्य धर्मग्रंथ शास्त्राच्या आधारे भजन / प्रवचन / कीर्तन / व्याख्यान / संमेलन / मेळावे / कृती सत्रे / कर्मशाळा / तीर्थयात्रा आदीद्वारे करणे तसेच त्यावर आधारित मासिक / सहामाही / वार्षिक / पत्रिका ज्ञानगंगा प्रकाशित व वितरीत करणे, अध्यात्मिक प्रार्थना स्तोत्रतांच्या सिडी बनविणे .
२. आमचे आराध्य दैवत श्री सद्गुरु भ्यायाजी महाराज यांचा जन्मोत्सव, पुण्यतिथी सोहळा व अन्य उत्सव, पालखी, शोभायात्रा आदी द्वारे आयोजन करणे व संपन्न करणे, त्यांचे मंदिर / ध्यान केंद्र निर्माण तसेच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक व इतर महाराजासंबंधी अध्यात्मिक कार्यक्रम राबविणे.
३. उपरोक्त ध्येयपर्ती हेतू दाजींचे उर्फ भय्याजी महाराजांचे मदिर, ध्यान मंदिर, सांस्कृतिक साधना भवन, अध्यात्मिक अध्ययन कक्ष निर्माण करून त्याची देखभाल करणे.
४. केंद्रशासन व राज्यशासनाच्या कल्याणकारी योजना ह्या संस्थेद्वारे राबविणे व त्यांची अंमलबजावणी करणे.
५. राष्ट्रीय एकात्मता वाढवीण्याकरिता राष्ट्रीय सण, सर्व धर्म संप्रदायातील दैवत संत, महापुरुष यांच्या जयंत्यांचे आयोजन करणे, धार्मिक वर्षातील सण साजरे करून सांप्रदायिक सदभावनेचे व राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित विवध कार्यक्रम करणे.
६. समाजाच्या उत्थानाकरिता हुंडा निर्मुलन केंद्र स्थापन करणे आणि निराधार महिलांसाठी निःशुल्क कायदे केंद्र तसेच समाजातील गरीब, दालीतजन व निर्वासित वृद्धांसाठी अनाथालय, वृद्धाश्रम, वसतिगृह स्थापन करणे.
७. संस्थेमार्फत युवकांना वैज्ञानिक दृष्टीकोण, कला संस्कृती व सामुहिक कार्यात भाग घेण्यास प्रवृत्त करणे, समाज कल्याण योजनांना प्रतिसाद देण्याची प्रवृत्ती निर्माण करणे तसेच राष्ट्रीय व सेवेची भावना निर्माण करण्यास विविध शिबीरांचे व कार्यक्रमाचे आयोजन करणे.
८. शहरी व मागासवर्गीय लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचविण्याच्या दृष्टीने त्यांना शैक्षणिक बाबींची सोय उपलब्ध करून देणे, कोन्व्हेंट, बालक मंदिर, पाळणाघरे, शिशु केंद्रे, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाल व विद्यालये , तंत्र निकेतन अभियांत्रिकी विद्यालये, वैद्यकी विद्यालये, वाचनालये स्थापन करून चालविणे.
९. अंध व अपंगासाठी विद्यालये, अपंगांच्या कर्मशाळा, मतिमंदांच्या शाळा, आश्रम शाळा, सामान्य व तांत्रिक विद्यालये, संशोधन केंद्रे, व्यायाम शाळा, रात्रशाळा इत्यादी सुरु करून अद्यावत ज्ञान-विज्ञानाच्या विस्तारासाठी प्रयत्न करणे.
१०. युवा युवतींना स्वयमपूर्ण करण्याकरिता कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, व्यावसायिक प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण, इत्यादी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयमरोजगाराकरिता प्रोत्साहित व प्रेरित करणे.
११. गारिब, अनाथ, असमर्थ, मुकबधीर, अपंग, आपातग्रस्त, दुष्काळग्रस्त लोकांसाठी विसावा, धर्मशाळा, निवारा बांधणे, चालविणे तसेच उपचारार्थ दवाखाना स्थापन करणे व चालविणे. किवा अशा अन्य ठिकाणी चाललेल्या कर्यास सेवा साहाय्य करणे.
१२. शिक्षणाचे महत्व लक्षात घेऊन गरीब विद्यार्थांचा बौद्धिक स्तर उंचाविण्याच्या दृष्टीने व त्यांचा विकास करण्याकरिता, शैक्षणिक सत्र चालविणे, चर्चासत्र, संमेलन घेणे, सांस्कृतिक कार्यक्रम घेणे तसेच विवध क्रीदाचे आयोहन करणे तसेच होतकरू, प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे स्वागत समारोह तसेच त्यांना प्रोत्साहन आणि अनुकूल सहायता इ. प्रदान करणे.
१३. रक्तदान शिबीर, कुष्ठरोग निर्मुलन / वैद्यकिय तपासणी शिबीर आयोजित करणे तसेच परमपूजनीय भय्याजी महाराजांचे आजारी भक्तांना भक्तांना दुर्धर आजार जसे कँन्सर, क्षयरोग हृदयरोग, संधिवात, एड्स, पोलिओ हिपायटेटीस इत्यादी रोगांच्या रुग्णांना समयानुकुल आवश्याक आर्थिक सहाय्यता, औषधोपचार, दवाखान्याचा खर्च, तत्संबंधी मदत करणे व त्यांची निगा राखणे.
१४. पर्यावरण संवर्धनाचे दृष्टीने सामाजिक वनीकरणाच्या योजना राबविणे, वृक्ष रोपण, पर्यावरण संवर्धन, जल - वायू संवर्धन, इत्यादी कार्यक्रम राबवून सुदृढ पर्यावरणाच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करणे.
मंडळाच्या सभासदांची यादी
| अ. क्र. |
सभासदाचे नाव व पत्ता | हुद्दा | दूरध्वनिक्र्मांक |
| १. | श्री दिवाकर अजबराव बेंडे
प्लॉट नं १५७, विजय २ अपार्टमेंट, पांडे लेयाउट, खामला, नागपूर |
अध्यक्ष | 09665300752 |
| २. | श्री ताराचंद्र आनंदराव मदनकर
जीएफ १/६, प्लॉट नं . ६, अपार्टमेंट नं ६, भोसलेनगर, लहान ताजबागमागे सक्करदरा, नागपूर |
कार्यकारी अध्यक्ष | 09822714973 |
| ३. | श्री शरद केशवराव वाराणशीवार
२६२, नंदनवन कॉलोनी, नंदनवन, नागपूर |
उपाध्यक्ष | 09921211077 |
| ४. | श्री मिलींद रामरावजी केदार
रा पाटणसवंगी, तह. सावनेर |
संयोजक | 09822464571 |
| ५. | श्री विजय वामनराव भोयर
त्रिमूर्तीनगर, नागपूर |
संयोजक | 09028129233 |
| ६. | श्री मिलींद गजाननराव हरदास प्लॉट नं ७१, गजानन धाम, खामला, नागपूर |
सहसचिव | 08275039399 |
| ७. | श्री विलास भास्करराव सदावर्ते
४९, बी तपोवन कॉलोनी, जयप्रकाशनगर, नागपूर |
कोषाध्यक्ष | 09225741765 |
| ८. | सौ अपर्णा सुनीलराव अग्नीहोत्री
एम--२१/३, नागपूर हौसिंग बोर्ड कॉलनी, त्रिमूर्तीनगर, नागपूर |
सह कोषाध्यक्ष | 09423105255 |
| ९. | सौ. निरा अनिलराव लाखे
प्लॉट नं २७१ बी, गजनुर अपार्टमेंट, त्रिमूर्ती नगर, नागपूर |
सदस्य | 07350017081 |
| १०. | श्री प्रदीप वासुदेवराव वैद्य
दि--०६, भगीरथ विहार, भरतनगर, अमरावती रोड, नागपूर |
सदस्य | 08600351231 |
| ११. | श्री अमर भीमराज शेंदरे, शेंदरे
भवन, टेलेफोन एक्सचेंज चौक सीए रोड, नागपूर |
सदस्य | 09595150066 |
| १२. | श्री सुनीलराव हरिभाऊ बालपांडे
४१, रानी इंदिराबाई भोसले विहार, तुळशीबाग रोड, महाल, नागपूर |
सदस्य | 09923196488 |
| १३. | श्री दिलीप भोलाजी धापके
रा. खुरजगाव, पो. मंगासा, तह. सावनेर, जि. नागपूर |
सदस्य | 08275039396 |
| १४. | श्री नंदकिशोर वामनराव मानकर
एस.डी. हॉस्पीटल मागे, नंदनवन, नागपूर |
सदस्य | 09923118448 |
।।जय सच्चिदानंद।।