Sixth

|| काव्यामृत  ||

बालवीरास निसर्ग काय शिकवितो?

जलबिंदूचा अगाध सिंधू, रंकाचा राव पंकामधूनी जनन पावते राजस राजीव।।1।।
वामन-मूर्ती विशाल झाली याग प्रसंगाला होई आंबट दधीपासूनी लोण्याचा भेला।।2।।
पाषाणाच्या परमेश्वराला जन सारा वंदी कांटेरी पादपांत फुलतो गुलाब मधुगंधी।।3।।
छायेचा सैतान, चिमुकल्या बीजा वृक्ष मतंगजाला वधुनि केसरी-छावा करि भक्ष्य।।4।।
क्षीण चंद्रमा कलेकलेने महोन्नती घेेई अवी कुलाला वीर एडका अलंकार होई ।।5।।
शून्यापासूनि ब्रह्माडांची पल्लवली वेल कृष्णकोकिला मधुर गायनी चढली कीर्ति-शैल।।6।।
रेशीम तंतू ेकाढूनि किटक अहा, धन्य झाला महापूरातूनि क्षुद्र अलाबु तारी जीवाला।।7।।
मातीमधुनि हेम, उचलली भुजंगमाने क्षिति सागर-झुक्ती घडते स्वाती-तोयाने मोत्यीं ।।8।।
बालवीरा हेच शिकवितो निसर्ग दिनरजनी ‘‘लध्वंतरींबी थोरपणाचे’’ तत्व धरा स्व-मनी।।9।।




एकी

जिकडे तिकडे जगात चाले एकीचा खेळ स्नेहापायी नष्ट जाहले बेकीचे मूळ।।1।।
पंचायन, गायित्री मिळूनी किती सर्कसीत वैर विसरूनी आनंदाने तालिम करितात।।2।।
काशीक्षेत्री भारतमाता मंदिर एकीचे ख्रिस्ति, हिंदु, यवनांच्या जणु ते संगम क्षेत्रांचे।।3।।
सप्तऋषींचा विहरे तांडा प्रेमाने गगनी रूचिर करिती मयूर तांडव शामां कद बघुनी।।4।।
सुलैमान, हिंदुकुश मिळुनी मायभूमि रक्षी काल कंठिती विहंग नाना एकीने वृक्षी।।5।।
राष्ट्रीय झेंडा परमपूज्य तो हिंदी जनतेला उंच अंबरी फडकुनि दावी एकी जगताला।।6।।
कारावासी उच्चनीच हा भिन्न भाव नाही हंसत खेळत हंसतमुखी सातरंग राही।।7।।
वैकंुठीच्या चतुर्दशीला मीलन हरिहर सर्वांभूती एकचि भरला देव निराकार।।8।।
गंजीफ्याच्या राजाला करी एक्का पदच्युत ‘‘साम्यवाद’’ हा काय दर्शवी दुनियेची फूट? ।।9।।




मरण

जननापासुनि दुःख चहुंकडे, अक्षय सुख निधनी मूलमंत्र हा जाणुनि सकलहि लागति यम-भजनी।।1।।
झेप घालुनी पतंग देई प्रेमाहुति ज्योती रणांगणी हर्षात रंगला बाजी-प्रभु अंती।।2।।
साहî कराया पितृदेवता निज पेंचातून राजस बाला कृष्णा पावली आनंदे निधन।।3।।
मृत्यु जाहल्यावरी हांसुनि इंद्रजीत वीर ‘‘आपद-हर्ता मृति’’ गाजवि हा डंका चैफेर ।।4।।
कलवेरासमवेत पतीच्या चितानली निजुनी अखंड निद्रा घेई ललना तल्लिन होवूनी।।5।।
आगमनावरी सकल यमाचे अभिनंदन करिती जिकडे तिकडे आनंदाच्या उर्मि उचंबळती।।6।।
मोदभराने वैरी डुलती निजारीच्या मरणी मावळतां रवि चढते त्याली पश्चिम घन-वदनी।।7।।
दुःख सागरी जीव घडिघडी आठवितो काल शोक होय का सांग कुणाला जाता धन-व्याल।।8।।
लाभाया चिरशांती जाई आज हा बलिदान निधन एक सकाळाला भुवनी सौख्याचे सदन।।9।।




दीपकान्योति

लवुनी गगनी रजनी-तम
निज बळे गृह शोभवि उत्तम
असील कीर्ति जरी बहु उज्ज्वल
परि वसे तुज अंतरि कज्जल

पवन मालवितो तुजला गडया
छळि पतंगचि घालुनिया उडया
प्रिय न मानिति यामिनि तस्कर
जळी तुला बघुनी पदि भास्कर

किती तरी विलसे जलमंदिरी
नयनरम्य तशी द्युति अंबरी
परि न सच्छिल तूं सुमनी-मनी
तिमिर एक तळी तव दुर्गुणी




चहा

कुणाला असे लालसा कामिनीची कुणाच्या मनी प्रियता कांचनाची कुणी शोधिती अंतरंगी प्रभूला परी ध्यास तुझाचि साÚया जगाला।।1।।
तुझा जहाला जन्म सिलोन देशी तसा चीन, आसाम दोन्ही प्रदेशी तरी भुवनी वाढला अग्रमान नसे थोर जो त्यास काही कठीण।।2।।
हरी नाठवीतां, तुला मात्र ध्याती असा चालतो खेळ नित्य प्रभाती असे बाल वा वृद्ध, श्रीमंत रंक मनी तूचि दे वाद्य त्यांच्या निशंक।।3।।
जयी मित्र ये मंदिरी चालुनीया करी पूर्ण सत्कार तू धावुनीया नसे एकही जो तुला ना स्विकर्ती असे कोणती जादु तुझ्या शरिरी।।4।।
तुझ्या प्राशने बुद्धिला स्फूर्ति येई जगी त्यामुळे काव्य निर्माण होई कुणी रंगवी भव्य कादंबरीला चरित्राहि लेखास की नाटकाला।।5।।
तुझा घेवुनी एकची प्रेम प्याला करी जागृती भक्त एकादशीला जिच्या अंमले विश्व दास्यात आले तया घोर निदे्रस तू जिंकियेले।।6।।
न घे प्राण तू शीघ्र वीषासमान मदिरापरी ना करी धूळधान असे उष्ण तू देहि चैतन्य आणी अशी ऐकतो किर्ति मी नीत कानी।।7।।
सुधाधी तुझा जन्म होता जरी रे तुला गौरविले तयी देव सारे तरी आज तू जाहला राजमान्य चहा होय त्याची जया गाठि पुण्य।।8।।
तुला त्यागिता साधु जाती वनासी सुखा आंचवूनी, पडे दुःखरासी तुझ्या थोर लीलेस गाईन शेष तिथे अज्ञ मी काय वर्णी विशेष?




मिष्टान्नाची झोड

ऐश्वर्य नांदे अजि मेदिनीत
मिष्टान्न खाती जिवजंतु नीत
आनंदसिंधु भरासि आला
वंदीतसे मी प्रभूच्या पदाला।।1।।

मुक्ताफळे भक्षिति राजहंस
खाई सदा मोदक श्रीगणेश
बाळासि देई मधुदुग्ध आई
लीला हरीची वद कोण गाई?।।2।।

मोदे अली गुंजुनि पद्मी जाई
बैसुनि तेथे मकरंद सेवी
सुग्रास घेई यजमान वृंद
संतोषवीतो सकलां मुकुंद।।3।।

वृक्षी विहंगावलि सानथोर
स्वच्छंद भक्षिति फळे रसाळ
आश्चर्य की क्षुद्र पिपीलि काही
ईश कृपे शर्कर नित्य खाई ।।4।।

भाग्यास नाही मिति मक्षिकेच्या
बैसुनी पोळीवरि ती मधाच्या
निर्विघ्न चाखी रस त्यामधील
मनी तयी ती सकलासि धूल।।5।।

मांडिती जे आसन देव ध्यानी
ब्रह्मर्षी खाती मधुकंद रानी
वृष्टी सुधांशू करि अमृताची
होई क्षुधाशांती चराचरी।।6।।

झोडुनिया नित्यचि मेजवानी
आनंदिती सर्व जगात प्राणी
दारिद्रî वल्ली मुळी नष्ट झाली
सौख्यद्रुमा गोड फळेच आली।।7।।




सर्प

असार दुनिया त्यागुनि
जीवन कंठी तू रानी
सेवन करूनी पवमान
अवलंबी विमलचरण
श्ंाकर भोला म्हणुनी तुजला
घालुनि कं़ठी गौरवितो
कैलासंातरी मिरवितो




प्रारब्ध

जावई अति वाकडे, कडकडे
पाहूनि सासू रडे।
तैसे शालक सासरा तडफडे
मध्यस्थि पायां पडे।
कन्या माणिक माकडासि दिधले
ती एक फासा चढे
गोविंदे कथिले तसेचि घडले,
प्रारब्ध पोरीकडे।।1।।




संसाराचा खेळ

खेळ असा तू खेळ मानवा, ज्यात समाधान
सावध असता सहज लाभते, नातारि धूळधाण।।धृ।।

संसाराचा खेळ असे हा, जित्या जीवासाठी
एकासाठी, देशासाठी, सकळ जगासाठी।।1।।

आजवरीचा अनुभव ऐसा, हारचि पदरात
सुख नाही पण सदानशिबी, दुःखाचे पर्वत।।2।।

विचार नसतां दशा बिघडली, काय करील देव?
प्रपंच वाढला, अन्नासाठी तडफडती जीव।।3।।

बेकारीचा बकासूर हा, खवखवला जगती
नीति बुडाली, धर्म बुडाला, जीवनात माती।।4।।

जाग मानवा, मार दानवा, व्याप कमी तव ताप कमी
चालू क्षणाला, खेळ जिंकुनी, टाळ रे बदनामी।।5।।

ज्ञानातूनि वा विज्ञानातूनि, अनुकूलता साधनी
आपण बुद्धिजीवी मानवा, नाहीच पशुयोनी।।6।।

थेबें थेंबे तळे साचते, होय क्रियाशील
इह पर लोकी साधसाधरे, मंगलमय खेळ।।7।।