Sixth
heading

|| पू. ह. बाबा ताजुद्दीन औलीया ||

"अशा ज्या दिव्य मूर्ति।सकलही ब्रह्ममूर्ति।सिद्ध मूर्ति ज्ञान मूर्ति। आनंद मूर्ति।।प्रा.स्तो."

[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]

भारतभुमी म्हणजे संत शिरोमणींची जणु दिव्य खाणच होय. अनेक संत, अनेक दिव्य पुरूष भू-भागावर अवतरले असून त्यातल्या त्यात विदर्भ भूमी म्हणजे अनेक संताची जन्मभूमी आणि त्यांच्या दिव्य कार्याची कर्मभूमी होय. याच विदर्भ प्रांतात शेगावंचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, माउली ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ,संत नामदेव अशा अनेक संतांचे विश्वाच्या कल्याणाकरिता अवतरण झाले. याच संत परंपरेतील एक दिव्य अवतारी पुरूष म्हणजेच मध्यभारतातील नागपूर क्षेत्री प्रसिद्धीस आलेले औलीया ताजुद्दीन बाबा.

 

ताजुद्दीन बाबांचे संपूर्ण नाव ताजुद्दीन सय्यद बदरूद्दीन. या सुफी संता चे अवतरण 27 जाने. 1861 रविवार रोजी मद्रास येथे मुस्लीम कुळात झाले. महाराजांचे वडिल सय्यद बदरूद्दीन हे मद्रास पलटणीत सुभेदार होते व त्यांचीआई श्रीमती मरियमबी साहेबा ही सुद्धा मद्रासी पलटन नं 32 मधील मेजर हजरत शेख मीरसाहेब यांची मुलगी होती. मुळातच लष्करी पेशा असलेले हे कुटुंब अत्यंत धार्मिक प्रवृत्तीचे होते.



जन्मास आल्यानंतर मूल रडत नाही म्हणून जुन्याप्रथेप्रमाणे त्यांच्या कपाळावर व टाळूवर डाग देण्यात आले व त्यानंतर त्यांनी डोळे उघडले व सर्वांकडे बघून स्मित हास्य केले. संसारात राहून देखील पाण्यातील कमळपत्राप्रमाणे निर्लेप राहण्याचे ते चिन्ह होते. बालवयातच बाबांचे कृपाछत्र हरवले व त्यानंतर आजीने त्यांचा सांभाळ केला.


बाबांनी वयाच्या 6 वर्षापासून पूर्ण एक तप शिक्षण घेतले व अरबी, फारशी, उर्दू व इंग्रजी विषयांचे ज्ञान प्राप्त केले. शाळेत शिकत असतानाच कामठीचे महान योगी श्री अब्दुल्ला साहेब तेथे आले व बाबांना बघताच उद्गारले ‘हे तर फार मोठे योगी होणार’? व त्यांना खारिकांचा प्रसाद दिला. बाबांचे जीवन बदलू लागले त्यांना एकांत आवडू लागला व ते आपला संपूर्ण वेळ नामस्मरणात घालवू लागले.


वयाच्या 20 व्या वर्षी बाबा नागपूरच्या नं. 13 च्या पलटनीत नोकरीस राहिले व तिथून 1884 मध्ये मध्य प्रदेशातील सागरला रवाना झाले. बाबासाहेब आपले फौजी काम आटोप ल्यावर ते महान संत श्री दाऊद साहेब हुसैनी यांच्या समाधी स्थळी बसून आपला वेळ ध्यान-चिंतनात घालवित असत. त्यांची अध्यात्मिक उन्नती झपाट्याने होऊन त्यांना सिद्धावस्था प्राप्त झाली. युरोप व आशिया देशांचा दौरा करून हैद्राबादला परत आले तेथे त्यांनी श्री बेन्स या अमेरिकन गृहस्थाला कुराणांतील उत्तम तत्वांचे ज्ञान देऊन स्वदेशी रवाना केले व दुसरे श्री विलियम यांना अध्यात्म शिकविले.


ही गोष्ट त्यांच्या आजीला कळली. तिचा विश्वास बसेना, म्हणून ती स्वतः सागरला गेली व बाबांना दाऊद साहेबांच्या समाधीस्थळी चिंतनात मग्न असताना तिने पाहिले व ईश्वर भक्तीत तल्लीन झालेल्या आपल्या नातवाला भरभरून आशिर्वाद दिले.


इकडे ईश्वर भक्तीत रममाण झालेल्या बाबांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. ही बातमी अधिकाऱ्यांनी आजीला दिली व आजी सागरला पोहचली व श्री बाबासाहेबांची विदेहावस्था पाहून ते वेडे झाले असावे म्हणून त्यांना कामठीला घेऊन आली. याच दरम्यान आजीचे देहावसान झाले. इकडे बाबासाहेब आपल्या उन्मनी अवस्थेत कामठीच्या गल्ली बोळात फिरू लागले, काही लोक त्यांना त्रास देत व दगड मारीत. पण ते मुळात वेडे नव्हतेच. असेच बाबा फिरत असतांना एका युरोपियन अधिकाऱ्यांनी त्यांना पागल समजवून 26 ऑगस्ट 1892 रोजी नागपूरच्या पागलखान्यात भर्ती केले. पागल खान्यात असतानाच तेथील अधिकाऱ्यांना बाबांच्या चमत्कारांचा अनुभव येऊ लागला व त्यांची ख्याती सर्वत्र पसरू लागली. व लोक दर्शनासाठी पागलखान्यासमोर गर्दी करू लागले. अशातच नागपूरचे श्रीमंत राजे रघुजीराव भोसले यांना महाराजांच्या दिव्य शक्ति विषयी श्री हिराबाबांनी कल्पना दिली व त्यांनी 21 सप्टेंबर 1908 मध्ये पागलखान्यातून मुक्तता करून सक्करदऱ्यातील आपल्या लाल महालाच्या बंगल्यात निवासाकरिता नेले. तेथे बाबासाहेबांची सेवा केली. बाबा सन् 1909 च्या सुमारास सक्करदऱ्यावरून वाकीला श्री काशीनाथराव पाटलांकडे आले, बाबा काशीनाथ पाटलांना आवडीने ‘नाना’ म्हणत. श्री काशीना- थरावांच्या ठायी साधकाची भूमिका पूर्णपणे तयार केली.


एके दिवशी बाबा वाकीजवळील कन्हान नदीच्या काठावर आपली भक्त मंडळी श्री काशीनाथराव पाटील, छोटू भाई, मामू अब्दुल रहेमान सोबत बसले होते कडाक्याची थंडी, शरद पौर्णिमेचा चंद्र व निरभ्र आकाश होते त्या प्रसंगी बाबांनी आपली कफनी काढून फेकली व चंद्राकडे पाहून उद्गारले,



एक इशारे पे किया चांद का दिल दो तुकडे।
आशिक इस आन को बरछीकी अनी कहते है।।


चमत्कार असा झाला की चंद्राकडे बोट दाखविताच आकाशातील चंद्राचे दोन तुकडे झाले, ते पून्हा एकत्र आले असे दोनदा झाले नंतर चंद्रपूर्वीप्रमाणे दिसु लागला किती हा दैवी खेळ! वाकी शरीफ येथे सुमारे एक तप वास्तव्य करून बाबा 29 जुलै 1917 रोजी सक्करदÚयाला परत आले.


हजर ताजुद्दीन बाबा हे या युगाचे दिव्य अवतारी पुरूष होते. त्यांच्या शिष्य संप्रदायात हिन्दू, मुस्लिम, शीख, पारशी, बौद्ध इ. विविध धर्माचे लोक होते. तसेच श्री दादाजी धुनीवाले, केशवानंद महाराज, बालाजी महाराज, निळकंठ महाराज, अय्यबाबाा शंकरसाई, अम्मा साहिबा इ. संत श्री बाबांच्या सहवासांत राहिलेत. त्याचप्रमाणे उपासनी महाराज ब्रह्मचारी बाबा निकालस महाराज इ. दिव्य पुरूषही बाबांच्या सहवासांत होते. मेहेरबाबा तर ह. ताजुद्दीन बाबांना आपले सद्गुरू मानीत. पू. ताजुद्दीन बाबांनी आपल्या अवतारकार्यात अनेक लीला केल्यात जसे मृताला जीवंत करणे, असाध्यरोग बरे करणे, फाशीच्या तक्त्यावरून सोडविणे, निसर्ग नियम बदलवून कडुनिंब गोड करणे (वाकी) वाघाने हुजूर बाबासाहेबांचे पाय चाटून नमस्कार करणे, 80 वर्षाच्या वृद्धाला पुत्रप्राप्ती होणे इ. तसेच वाकी येथे वास्तव्य असतांना(अरब देशातील ) मक्का-मदिना येथील हाजी लोकांना दर्शन देणे, तसेच पू. बाबांनी आपल्या भक्तांना श्री शिव, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री दत्त, श्री विðल, महमंद पैगबर इत्यादी. स्वरूपात दर्शन दिले.


17 ऑगस्ट 1925 अर्थात मोहरम 26 हि.स. 1944 सोमवार रोजी सायंकाळी महाराजांनी महाप्रयाण केले 25 ऑगस्ट 1925 च्या ‘इव्हनिंग न्यूज‘ या इंग्रजी पत्रांत नारायणराव हेडाऊ यांनी मजकूर छापला तो असा


‘बाबांच्या निधनानंतर नागपूरच्या पांडुरंग मंदिरातील विठ्ठल व रखुमाई या मूर्तीच्या डोळ्यांमधून अश्रू सतत बारा तासपर्यंत ओघळत असल्याचे त्यांनी स्वतः पाहिले. व हजारो लोकांनी सुद्धा पाहिले. हा चमत्कार ह. ताजनाथ साहेब परमात्म्यात विलीन होता क्षणीच सुरू झाला, असं म्हणतात.’’


तात्पर्य हेच की या अध्यात्मिक क्षेत्रांत धर्म, पंथ, जात, स्त्री-पुरूष भेद यांना गौण स्थान असते. कारण दिव्य शक्ति ही चराचरांत व्यापलेली सर्वात्मक, सर्वव्यापी असते. आणि हे आध्यात्मिक दिव्य पुरूषांचे चरित्र आपल्याला समानतेचा एकात्मतेचा संदेश देते.



।।जय सच्चिदानंद।।