Sixth
heading

|| पू. ह. महंमद शफीबाबा ||

[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]

प.पू. ताजुद्दीन बाबांच्या दिव्य परंपरेतील पू. शफीबाबा व त्याच परंपरेतील दिव्य पुरूष म्हणजे प.पू. भय्याजी महाराज हे होत. प.पू.शफीबाबांचे पू. भय्याजी महाराज हे आध्यात्मिक उत्तराधिकारी होते प. पू शफीबाबांनी त्यांना आपले शिष्यत्व बहाल केले होते प.पू.ताजुद्दीन बाबांच्या परंपरेतील ह.शफीबाबा हे सुफी संत प.पू.भय्याजी महाराज हे ब्राह्मण होते. पहिले उत्तर भारतातले(शफी बाबा) तर दुसरे नागपूर जिल्हयातल्या सावंगीचे (पू.भय्याजी महाराज) पहिले बालब्रह्मचारी तर दुसरे प्रपंच नेटका करणारे गृहस्थाश्रमी पण त्यांचे ईश्वरप्रेरणेने 1940 साली पहिल्या मुलाखतीतच मनोमिलन झाले.

पपू. शफीबाबांचा जन्म 1878 साली हरियाणा राज्यातील रोहतक जिल्हयातील कानुरनगाडा या गांवी झाला. वकिलांचे नांव महंमद अल्लाउद्दीन व आईचे ना गफुरबी साहिबा होते.

पू. शफीनाथांचे मोठे बंधू सैन्यात मोठया पदावर होते व त्यांना भारत सरकारकडून ‘‘हिंदका सितारा’’ हा बहुमान मिळाला होता. शफीनाथ तीन वर्षाचे असतानाच आईचे देहावसान झाले. घराण्यातील परंपरेनुसार शफीनाथ साहेब तरूणपणीच सैन्यात भरती झाले. सन 1914 मध्ये प्रथम विश्व युद्धाकरिता परदेशात गेले. त्या वेळी ईश्वराच्या शोधंात इराक मधील बगदाद शहरात आले. त्यावेळी पीर सय्यद इब्राहिम या सत्पुरूषाची भेट झाली व त्यांनी आशीर्वचन देऊन नागपूरला पू. ताजुद्दीन बाबांकडे जाण्याचा आदेश दिला.

तेथून ते थेट पू. ताजनाथांच्या दर्शनासाठी नागपूरला आले. बाबांनी त्यांच्याशी अंतरंग आध्यात्मिक संवाद केला व बाबांच्या आदेशानुसार ते पुन्हा दक्षिण भारत भ्रमणाकरिता निघाले व सन 1939 साली हैद्राबाद स्थित शर्फुद्दीन नावाच्या संताच्या समाधी स्थळी वास्तव्य केले. तिथे त्यांना सन 1940 साली ताजनाथांनी दृष्टांत देऊन सावनेरला महाराजांना भेटण्याकरीता मार्गदर्शन केले व त्यासाठी त्यांनी नागपूरला प्रयाण केले.

पू. शफीनाथ नागपूर जिल्हयाच्या सावनेर मधील पिंजारपुÚयाचा एका मशीदीत राहण्यास आले व तिथे नित्यनियमाने नमाज करीत असत. पू. भय्याजी महाराज व श्री. फत्तुबाळबुधे सावंगीवरून सावनेरला कचेरीला याच मशीदी समोरून जात, त्यांची वेळ निश्चित नसे, परंतु एके दिवशी ते मशीदी समोरून जात असताना त्याच वेळी शफीनाथ आणि बाबांची दृष्टदृष्ट झाली बाबांना श्री ताजनाथांच्या दृष्टांताचा साक्षात्कार झाला. बाबांच्या मुखातून उत्स्र्फूतपणे उद्गार निघाले, ‘‘या अल्लाह क्या पाक चिडिया है,’’ प्रथम दृष्टीतच मनोमिलन झाले. असाच प्रकार दुसÚया दिवशीही घडला. महाराजांनी मशीदीच्या दारावर आलेल्या शफीबाबांना नमस्कार केला. बाबांनी हात उंचावून त्यांना‘‘वालेकुम सलाम’’ म्हणाले. तिसÚया दिवशीही असेच घडलें महाराज क्षणभर त्यांच्या कडे बघत राहिले पू. शफीनाथांनी महाराजांचा हात धरून मशीदीत आपल्या खोलीत नेले व तिथे महाराजांना आपल्या हातांनी चहा देउन म्हणाले ‘‘महाराज आपको अल्लाह की नौकरी करनी है । हम आपको संभाल लेंगे। महाराजांनी आपल्या नाथांना साष्टांग नमस्कार केला बाबांनी महाराजांना आपली आध्यात्मिक शक्ती प्रदान केली. गुरू शिष्यांचे प्रेम व महाराजांचा शफीनाथाबद्दल आदर अलौकीक होता.

शफीनाथांनी आपल्या भक्तांना ‘‘हमारे महाराज से मिलो’’ असा संदेश देणे सुरू केले पू. शफीनाथही सावंगीला महाराजांच्या डेÚयावर जात असत. साई भक्त श्री नारायणबाबा साईनाथंाच्या आदेशावरून बाबांना भेटण्यास पायदळ शिर्डी ते नागपूर आले तेव्हा शफीनाथांनी ‘‘महाराजसे मिलने सावंगी जाव’’ असे म्हटले व श्री.नारायणबाबांनी पू. भय्याजी महाराजांची भेट घेतली.

पू.शफीनाथंानी आपल्या महाप्रयाणाची कल्पना आपल्या भक्तांना देऊन ‘‘मेरे बाद सुखदेव महाराज संभाल लेंगे’’।मुझे जो भी देना था, वह सब कुछ उन्हे दे दिया’’अशी सूचना दिली. महाप्रयाणाच्या दोन दिवस आधी 25 जाने. 1970 रोजी महाराजांना आपल्या जवळ बोलवून एकांतात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. ती जागाही निर्देशीत केली ज्या ठिकाणी आता शफीनाथांची समाधी पू. ताजनाथांच्या परिसरात ताजाबाद येथे आहे. पू. भय्याजी महाराज सावंगीला परतण्यास निघाले तेव्हा शफीनाथांनी त्यांना निर्देश केला. ‘‘आता यायचे नाही सावंगी वरूनच सर्व आध्यात्मिक कार्य करावे’’.जातांना शफीनाथबाबा महाराजांकडे पुष्कळ वेळ एकटक पाहत राहिले असे या आधी घडले नव्हते. 27 जाने 1970 ला शफीनाथांनी महाप्रयाण केले. मुसलमानी महजबी प्रमाणे 7 मार्च 1970 हा चाळीसावा दिवस सर्व मुसलमान भाविकांनी साजरा केला. शफीबाबांनी दिलेल्या आदेशानुसार दुसÚया दिवशी कुलशरीफ दरम्यान पू. भय्याजी महाराजांना ह. करीम बाबा साहेबांनी ‘दस्तारे सज्जादगी बांधली. शफीबाबांच्या निर्देशानुसार भय्याजी महाराजांनी सावंगी येथे आम्रंवृक्षाखाली म्हणजेच डेÚयावरून आध्यात्मिक कार्य सुरू केले. आणि ‘ताजआनंदाश्रम सावंगी’ हे एक सर्वधर्मसमभावाचे आध्यात्मिक केंद्र बनले.



।।जय सच्चिदानंद।।