Sixth

|| श्रद्धा स्थान  ||

श्री ताज आनंदाश्रम

।। सर्वेपि सुखिनः सन्तु। सर्वेसन्तु निरामयाः।।

सद्गुरू भय्याजी महाराजांनी श्री ताज आनंदाश्रमाची स्थापना सावंगी तीर्थक्षेत्री केली. ह्या आश्रमाला मागील अनेक वैशिष्ट्ये आहेत. आजच्या कलीयुगामध्ये माणसाला सुख समाधान व शांतीची गरज आहे. धर्माच्या नावावर होणारा संहार थांबला पाहिजे. अंधश्रद्धेला मनुष्य बळी पडत आहे. माणसांमाणसांमध्ये भेद-द्वेषाची भावना निर्माण होत चालली आहे हे सर्व थांबले पाहिजे, त्यासाठी गरज आहे ती मानव धर्माची, माणूसकी निर्माण करण्याची, विज्ञानाला आध्यात्माची जोड देण्याची आणि नेमका हाच संदेश देण्यासाठी महाराजांनी श्री ताज आनंदश्रमाची स्थापना केली.

या भुतलावर विश्वबंधुत्व नांदावे ही महाराजांची तळमळ आपल्या शेतातील अन्नधान्य सेवा म्हणून महाराजांना समर्पित करू लागले. तेव्हा महाराजांनी आपले सद्गुरू शफीबाबांच्या आदेशावरून आपल्याच शेतात आश्रमाचे बांधकाम केले. श्रीताजआनंदाश्रम ह्या नावातच सर्वधर्म समभाव सामावलेला दिसतो. महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिह्यामधील सावनेर या तालुक्यातील झिल्पा-काटोल मार्गावर सावनेर पासून अवघ्या कि.मि. अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात हे तीर्थक्षेत्र वसले आहे.



[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]

डेरा

महाराज आपल्या शेतातील आम्रवृक्षाखाली बसायचे ती जागा डेरा म्हणून ओळखली जात आहे. आज त्याच ठिकाणी महाराजांचे स्मृति मंदिर भाविकांच्या योगदानाने सद्गुरू भय्याजी महाराजांनी श्री ताज आनंदाश्रमाची स्थापना सावंगी तीर्थक्षेत्री केली. ह्या आश्रमाला मागील अनेक वैशिष्ट्ये आहे. महाराज घरून डेÚयावर आले की आम्रवृक्षाखाली बसायचे व आलेल्या दर्शनार्थींना ते याऽऽऽ म्हणून हाक मारायचे, या हाकेमध्ये मोठा जिव्हाळा प्रत्ययाला येई.





झोपडी

पू. भय्याजी महाराजांची झोपडी जेथून ते जगत्कल्याणाचे कार्य करीत ही कुटी आजही मूळ स्वरूपात जतन करून ठेवली आहे.





मोठा आंबा

पू. शफीबाबांचे सद्गुरू म. ताजुद्दीनबाबा यांचे स्थान असून त्या ठिकाणी दर्शनार्थीं पू. भय्याजी महाराजांची दर्शनासाठी वाट बघत हेच ते पवित्र स्थान.





पावन आम्रवृक्ष

महाराजांचे सद्गुरू पू. शफीबाबा यांच्या पदरजाने पूनित झालेली ही सावंगी भूमी त्यावेळी शफीबाबा सावंगीला आल्यावर ते ह्या आम्रवृक्षाखाली स्थानापन्न व्हायचे तोच हा पावन आम्रवृक्ष.





पावन औंदूबर

पू. भय्याजी महाराजांना श्री दत्त प्रभूंचे दर्शन झाले. व त्या ठिकाणी औंदूबर निघाला, या पावनस्थळी आपण मनोभावे प्रार्थना केली. तर त्याची मनोकामना पूर्ण होते. याचा अनुभव भाविक आजही घेतात.





भय्याजी महाराज स्मृति मंदिर

सोमवर दिनांक 21 जुलै 1986 च्या गुरूपौर्णिमेला भगवत भुषण स्वामी दर्शनानंदजी रमणरेती, मथुरा, यांच्या हस्ते मंदिराच्या वास्तुचे भुमीपूजन झाले. तद्नंतर त्याच वषींच्या विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर रविवार दि. 12 आॅक्टोंबर 1986 रोजी मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ केला व अल्पावधीतच महाराजांचे सुंदर स्मृति समाधी मंदिर आकारास आले. विशेष म्हणजे या संुदर व भव्य वास्तूची उभारणी भाविकांच्या सहकार्याने व त्यांच्या योगदानातून झालेली आहे. परम पूजनीय भय्याजी महाराजांची अनंत भाव एकवटलेली मनमोहक मूर्ती जयपूरच्या सुप्रसिद्ध श्री रामकृष्ण मुर्ती भंाडार येथे तयार करवून घेऊन दिनांक 15 जानेवारी 1992 रोजी मकरसंक्रमणाच्या शुभपर्वावर महामंड- लेश्वरी स्वामी मंगलनंदजी महाराज, गीता मंदिर अहमदाबाद व त्यांच्या इतर सहकारी साधु पुरूषांच्या उपस्थितीत वेदपठन करून मुर्तीची स्थापना मंदिराच्या गाभाÚयात केली. आजही जे भाविक श्रद्धेने येथे येतात त्यांचे मनोगत पूर्ण होते.





सर्वधर्म समभावाचे जागते प्रतिक

ह. ताजनाथांची परंपरा, महाराजांचे सद्गुरू ह. शफीनाथ साहेबांनी जोपासली. त्यांनी मात्र आपली अध्यात्मिक संपदा महाराजांना बहाल केली. हजरत शफिनाथसाहेब इस्लामधर्मीय तर महाराज हिंदूधर्मीय अध्यात्मामध्ये जाती, धर्म, पंथाचे भेदभाव विराम पावतात हेच या अध्यात्मिक परंपरेतून स्पष्ट होते. एका हिंदूधर्मीय अवतारी पुरूषाच्या समाधीवर फुलांबरोबरच श्रद्धेने चादर चढविली जाते. श्री ताज आनंदाश्रम सावंगी येथील पूजनीय भय्याजी महाराजांच्या मानवतेच्या चैतन्य मंदिरापासून अशी प्रेरणा घेतली तर सर्वधर्मसमभाव व त्यातून खÚया अर्थाने विश्वबंधूत्व व निखळ प्रेमाचा आनंद अनुभवाला आल्याशिवाय राहणार नाही.





प्रार्थना महोत्सव

मुमुक्षुस आत्मानुभुती होण्यासाठी महाराजांनी, ‘‘अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र’’ या दिव्य ग्रंथाची रचना 1965 साली केली. हा ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात असतांनाच त्यावर त्याच वर्षीच्या मकर- संक्रमणाच्या शुभमुहुर्तावर प्रार्थना महोत्सवाचे आयोजन प्रथमतःचश्री ताज आनंदाश्रम सावंगी येथे केले. तेव्हापासून आजपर्यत या ग्रथांवर अनेक विद्वान पंडीतांनी प्रवचन केले. यामध्ये मधुकर मुंजे, रत्नपारखी, आवदे गुरूजी सावनेर, पाध्ये गुरूजी, महंत गुरूजी, मोरे गुरूजी, दादासाहेब भारदे, शोभनाताई रानडे, दत्तात्रेय कविश्वर, डाॅ.यु.म. पठाण, डाॅ.अ.ना. देशपांडे,

विद्याधर गोखले, राम शेवाळकर, आबा महात्मे, डाॅ.श्री भा वर्णेकर, बाबा महाराज सातारकर, ह.भ.प. एकनाथजी गोळकर महाराज, ह.भ.प. श्री लक्ष्मणदासजी काळे महाराज, ज्ञानसाधू वासूदेवराव चोरघडे, श्री अरूणराव देशपांडे, प्रा. विश्वनाथ दा. कराड आदींचा सामावेश आहे. महाराजांनी सुरू केलेला हा प्रार्थना महोत्सव आजही मकरसंक्रमणाच्या शुभ पर्वावर आयोजिला जातो.या महोत्सवाची व्याप्ती दरवर्षी वाढते आहे.





पुण्यतिथी महोत्सव

परमपूजनीय भय्याजी महाराजांनी आपले अवतार कार्य 15 एप्रिल 1984 ला अर्थात हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला संपवून ब्रह्मलिन झाले. या तिथीला महाराजांची पुण्यतिथी मोठ्या भक्ति भावाने साजरी केली जाते. पहाटे समाधीवर महाअभिषेक, पुजन, आरती, श्री ची पालखीतून शोभायात्रा, काल्याचे किर्तन, दहीहांडी, प्रसाद वितरण व महाप्रसाद आदि पुण्यतिथी महोत्सवाच्या ठळक बाबी मानता येतील. भाविक दूरदूरहून वाजत गाजत दिंड्या, पुजा संदल घेऊन येतात व मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेऊन कृतकृत्य होत असतांना दिसतात या निमित्ताने भाविकांची अलोट गर्दी उसळते व हा उत्सव मोठ्याप्रमाणात व श्रद्धेने साजरा करण्यात येतो. महाराजांची लीला अगाध आहे. आजही जे ज्या भावनेने येथे येतात त्या भावनेचे फळ त्यांना मिळाले.





काकड आरती

दररोज पहाटे पंचामृताने महाराजांच्या समाधीला अभिषेक केल्या जातो. विधिवत पूजा करून चादर चढविली जाते. महाराजांच्या मुर्तीला अलंकृत करून हार-आभुषणे व डोक्याला रूमाल बांधून पूजा केली जाते. तसेच सकाळी व सायं. 6 वाजता नित्यनियमाने आरती, असा दैनंदिन क्रम असतो.





माहावर भजन

दर महिन्यातील पौर्णिमेच्या जवळील रविवार ह्या दिवशी भजनाचा कार्यक्रम भक्तांच्या सहकार्याने आयोजीत केल्या जातो. धुलिवंदन, गुरूपौर्णिमा, अनंत चतुदर्शी, पुण्यतिथी महोत्सव (हनुमान जयंती) या तिथीला भजनाचे आयोजन होत असते. तसेच ह्या कार्यक्रमामध्ये अनेक भाविक व भजनी मंडळी आपली सेवा श्रीचरणी रूजू करतात.



।।जय सच्चिदानंद।।