Sixth
heading

|| प. पू. भय्याजी महाराज ||

[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]
[Alternative text]

महाराजांची कर्मभूमी सावंगी, तालुका, सावनेर जिल्हा नागपूर. महाराजांचा जन्म वत्सगोत्री बुधोलिया घराण्यात सौ. जानकीदेवी व नारायणजी या सात्विक दाम्पत्याच्या पोटी पौष वद्य चतुर्थी, शनिवार दि. 29 जाने 1910 रोजी दुपारी 3 वा. सावंगी मुक्कामी झाला. जन्माआधी त्यांच्या मातेला प्रभू रामचंद्रानी दृष्टांत दिला. अशाप्रकारे रामावतार असलेले हेच आपले भय्याजी महाराज.

मातापित्यांनी त्यांचे नाव सुखदेव ठेवले. साÚया मानवजातीला सुखी करण्यासाठी देव अवतरले हाच त्यांच्या नावाचा अर्थ होता. त्यांचे शालेय शिक्षण नागपूर येथे डी.डी. नगर विद्यालयात झाले.


लहानपणापासूनच महाराजांची परमार्थाकडे ओढ होती. ते 14 वर्षाचे असतांना आपल्या बंधू सोबत सक्करदरा येथे ह.बाबा ताजुद्दीनांच्या दर्शनास गेले तेव्हा ताजुद्दीनबाबा महाराजांकडे पाहताच राहिले.व त्यांनी आपल्या गळयातील हार काढून भय्याजी महाराजांच्या गळयात घातला. एक प्रकारे ताजुद्दीनबाबांनी महाराजांना दिलेली शक्तिपात दिक्षाच होती. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाल्यावर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी महाराज सावनेरला आले.


सावनेर येथे कचेरीत अर्जनवीस म्हणून रूजू झाले. ईश्वराचे नित्य अनुसंधान व साधना मार्गाचे अनुसरण महाराजांचे सुरू होते. रोज पहाटे कोलार नदीच्या तीरावर जाऊन ते ध्यान धारणा करीत. तपःसाधना सुरू असतांना एकदा त्यांची प्रकाशनाथ योग्यांची भेट झाली. त्यांनी महाराजांना काही योेगाचे अंग शिकविले, व सहा महिन्यात फकीर वेषात तुमच्या गुरूची भेट होईल असे भविष्य वर्तविले. ताजुद्दीन इकडे नागपूरच्या दिव्यावतारी पू.ताजुद्दीनबाबांनी पू. शफीनाथांना सावनेरला पू. भय्याजी महाराजांवर कृपा करण्याकरिता पाठविले. सावनेरच्या पिंजारपुÚयातील मशीदीत शफीनाथ वास्तव्याला आले. महाराज कचेरीला जात असता शफीनाथ मशीदीपुढे येऊन उभे राहात. महाराज त्यांना ‘वालेकुम सलाम’ करीत. एक दिवस शफीनाथांनी महाराजांना मशीदीत नेले. स्वतःच्या हाताने चहा करून दिला व म्हणाले, ‘‘महाराज आपको अल्लाह की नौकरी करनी होगी हम आपको सभांल लेंगे’’. पू.महाराज शफीनाथांना अनन्यभावे शरण गेले. शफीनाथांनी आपली सारी आध्यात्मिक शक्ती त्यांच्यात संक्रमित केली.


सावंगी येथे महाराजांचा आज जो ‘श्री ताज आनंदाश्रम आहे,‘ त्या ठिकाणी महाराज एका आम्रवृक्षाखाली बसत. येणाÚया साÚया आप्तांची दुःखे जाणून घेत व त्यांना मार्गदर्शन करीत. तेथेच एका कुटीत महाराज कधी कधी वास्तव्याला राहात. त्याला डेरा असे म्हणत, महाराज येणाÚया लोकांना आधिव्याधी दूर करण्याबरोबर अध्यात्माची शिकवण देत. या शिकवणीचा परिपाक म्हणजे महाराजांनी रचिलेले,‘‘अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र’’. या अध्यात्मिक ग्रंथावर प.पू. गुळवणी महाराज, बाबा महाराज सातारकर, श्री.विद्याधर गोखले, बाळासाहेब भारदे, राम शेवाळकर इ. नामवंतांनी उद्बोधन केले आहे. आजही मकरसंक्रमणाचा पर्वकाळ साधून आश्रमात ‘‘प्रार्थना महोत्सवाचे ’’ आयोजन केल्या जाते.

आश्रमात येणाÚयांना अन्नदान, प्रार्थना स्तोस्त्राचे पारायण, यावर महाराजांचा भर होता. ताजनाथांनी ताजआनंदाश्रम हा दिव्य शक्तीचे केंद्र स्थान होईल असे भविष्य वर्तविले होते. महाराज चैत्र पौर्णिमा-हनुमान जयंती रविवार दि. 15 एप्रिल 1984 रोजी ब्रह्मलीन झाले. सावंगीला महाराजांनी निर्देशिलेल्या जागेवर भव्य समाधी मंदीर बांधल्या गेले आहे.

‘महाराजांची जयंती, मकरसंक्रमणाच्या पर्वावर ‘‘प्रार्थना महोत्सव, चैत्र पौर्णिमेला पुण्यतिथी, व दर महिन्याच्या पौर्णिमेला लागून असलेल्या रविवारी ‘मासिक भजन’ हे आश्रमाचे नित्याचे कार्यक्रम आहेत. आणि ‘श्री. ताजआनंदाश्रम सावंगी’ येथे महाराजांचे भव्य ‘समाधी मंदीर’ उभारले आहे.



‘जो जे वांछिल तो ते लाहो’


या संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पसायदानांतील ओवीप्रमाणे सद्भक्तांच्या सर्व मनोकामना येथे पूर्ण होतात आणि प्रार्थना स्तोत्रांत पू. भय्याजी महाराजंानी सर्व साधकांना आश्वस्त केल्याप्रमाणे ‘मुमुक्षुस मुक्तिधाम लाभतचि’हे निश्चितच!





।।जय सच्चिदानंद।।