।। नमः परमात्मने सच्चिदानंद।।
जन्म - सावनेरजवळील सावंगी गावी पौष वद्य चतुर्थी शनिवार दि. 29 जानेवारी 1910 रोजी दुपारी 3 वाजता.
माता-पिता - माता सौ. जानकीदेवी नारायणजी बुधोलीया व पिता श्री नारायणजी फकीरचंद बुधोलीया. महाराजांच्या जन्माच्या दोन महिन्याआधी सौ. जानकीदेवीना स्वप्नात धनुष्यधारी प्रभु रामचंद्र घरी येत आहे. असा दृष्टांत दिसला महाराजांच्या जन्माच्या वेळी लखलखीत प्रकाश पडला या प्रकाशात सौ. जानकीदेवीना समोर बालकरूपात प्रभु श्रीराम दिसले.
बालपण - महाराजांचे बालपण सावंगीला गेले. ते बालपणापासूनच मातृपितृथस्त, धार्मिक, सत्यवचनी, समाधानी व वैराग्यवृत्तीचे होते.
शिक्षण -
1) 1917 ते 1920 पर्यंत प्राथमीक शिक्षण अभ्यंकर प्रायमरी शाळा (टेकडीची शाळा ) सावनेर .
2) 1920 नंतर उच्च माध्यमिक शिक्षण निलसिटी हायस्कूल, महाल, नागपूर या शाळेत इंग्रजी माध्यमातून
3) 1925 साली मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण
4) 1926 साली नागपूरच्या सायन्स कॉलेजमध्ये प्रवेष (2 वर्शे)
वाचन - सर्वश्री वामनपंडीत मोरोपंत, रघुनाथ पंडीत, नारायण मुरलीधर गुप्ते, भा. रा. तांबे, यांची वाडमय राम गणेश गडकरी शेक्सपीअरची इंग्रजी, नाटके, संत ज्ञानेष्वर, रामदास स्वामी तुकाराम महाराजांचे संत वाडमय आनंद रामायण तुलसी रामायण, भगवतगीता, नारदभक्ती सुत्र स्वानंद साम्राज्य इ.
नौकरी - 1930 साली नागपूरचे श्री बाळ गंगाधर चिटणवीस यांचेकडे सावनेरला जमाखर्च लिहिण्याची नौकरी नंतर काही काळ सावनेरला तहसील येथे अर्जनविसी केली.
आध्यात्मीक ओढा -
1) महाराज 14 वर्षाचे असताना प. पु. ताजनाथानी आपल्या गळयातील सुगंधी फुलांचा हार महाराजांच्या गळयात टाकला.
2) कोणतेही काम करीत असतांना ते ईष्वररोपासनेत निमग्न राहात.
3) काही काळ अवतार मेहेरबाबाषी संबंध व पत्रव्यवहार
4) रात्री सर्वांची निजानीज झाल्यावर महाराज कोलार नदीच्या काठावर पहाटे 4 वाजेपर्यंत ध्यानधारणा करीत.
5) हिमालयातील मोठे योगी श्री प्रकाशनाथ यांच्यासोबत 1939 साली महाराजांचा सत्संग व हटयोगाचे ज्ञान प्राप्त.
6) 1940 साली ह. शफीनाथांचा सदगुरू म्हणून महाराजांवर वरदहस्त.
।।जय सच्चिदानंद।।